ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीय,
तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते;
कारण "आनंदा"ची किंमत त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते..
जोपर्यंत आपण स्वतः काही प्रयत्न करत नाही,
तोपर्यंत आपल्याला कल्पनाच नसते की आपण किती सक्षम आहोत आणि काय करु शकतो..
आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते,
मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात;
ह्या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो,
"तो जीवनात यशस्वी होतोच.."
कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करत असताना,
"आपली सुरवात कशी होईल"
ह्याची कधीच भीती बाळगू नका;
कारण सूर्य बुडताना दररोज दिसतो,
पण तो बुडत कधीच नाही...
उगवता सूर्य सुंदर असतो,
परंतु रात्र संपल्याशिवाय तो बघता येत नाही;
तसेच यशाचा सूर्य बघायचा असेल तर,
प्रयत्न-कष्ट व चिकाटी ह्यांची कास धरावी लागते..
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्न मनात धरलेले कधी मोडू नका;
पावलोपावली येतील कठीण प्रसंग,
फक्त चंद्र-तारकांना जिंकण्यासाठी तुमच्या जमिनीला सोडू नका..
दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो;
त्याच प्रमाणे तुम्ही स्वत: विषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील..
जिवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे;
तो भूतकाळात काय घडलं आहे ह्याचा विचार न करता,
वर्तमान व भविष्यकाळाचा विचार करून पुढे चालतो..
कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करत असताना,
"आपली सुरवात कशी होईल"
ह्याची कधीच भीती बाळगू नका;
कारण सूर्य बुडताना दररोज दिसतो,
पण तो बुडत कधीच नाही...
उगवता सूर्य सुंदर असतो,
परंतु रात्र संपल्याशिवाय तो बघता येत नाही;
तसेच यशाचा सूर्य बघायचा असेल तर,
प्रयत्न-कष्ट व चिकाटी ह्यांची कास धरावी लागते..
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्न मनात धरलेले कधी मोडू नका;
पावलोपावली येतील कठीण प्रसंग,
फक्त चंद्र-तारकांना जिंकण्यासाठी तुमच्या जमिनीला सोडू नका..
दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो;
त्याच प्रमाणे तुम्ही स्वत: विषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील..
जिवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे;
तो भूतकाळात काय घडलं आहे ह्याचा विचार न करता,
वर्तमान व भविष्यकाळाचा विचार करून पुढे चालतो..
पुर्णविराम म्हणजे शेवट नाही,
कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो;
तसेच जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो,
तर ती नव्या यशाची सुरूवात असते..
आयुष्य हि फार अवघड शाळा आहे;
आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं,
पुढची परीक्षा कोणती आहे याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही
कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका हि वेगळी असते..
ओळखीतून मिळालेले काम अल्पकाळ टिकते,
पण कामातून मिळालेली ओळख आयुष्य घडविते;
म्हणून ओळखीतून काम मिळवण्यापेक्षा कामातून ओळख मिळवा..
आकाशात ऊन व पावसात युध्द चालते तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते;
आयुष्य सजवायचे ते अशा इंद्रधनुष्यांनी,
तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर इंद्रधनुष्य फुलवण्याची संधी मिळते..
बुद्धिबळ खेळताना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावी लागते,
आयुष्यात वाटचाल करताना पण कधी कधी काही पाऊले मागे वळवावी लागतात;
पण पाऊले मागे म्हणजे हार नाही,
कारण चार पावलं मागे आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही..
समुद्र कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिले तर ते बुडल्याशिवाय राहत नाही;
तसेच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही..
आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात
आणि
योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक;
माणसाला त्याच्या विचारांचे व जीवनाचे
प्रवाह बदलण्यास भाग पाडतात..
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी,
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी;
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी,
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी..
प्रत्येकवेळी ज्याची इच्छा करतो तेच आपल्याला मिळेल असे नाही,
परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काही मिळतं ज्याची अपेक्षा नसते;
हा आपण केलेल्या चांगल्या कामांचा मिळालेला "आशिर्वाद"
जीवनात अडचणी त्यालाच येतात,
जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते;
जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत,
ते जिंकतात किंवा शिकतात..
आकाशाला गवसणी घालणा-या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते;
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते,
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते..
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल
पण लयलुट करायची सुगंधाचीच;
आनंद हा चंदनासारखा असतो,
दुस-यांच्या कपाळावर लावला तरी तो आपलीच बोटे सुगंधीत करुन जातो..
#marathi #suvichar #thought #quotes #motivational #inspirational #success